शिवसंस्कार मंडळ, कशेळीच्या वतीने डॉ. शंकर कलवारी यांचा सन्मान

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील कशेळी येथील शिवसंस्कार मंडळाने आजही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेली ८ वर्ष या मंडळामार्फत विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर हा उपक्रम घेण्यात येतो. कशेळी पंचक्रोशीतील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कित्येक लोकांना याचा फायदा होत आहे.

यावर्षी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने कोरोनाच्या काळात महत्वाची कामगिरी करणाऱ्या “कोरोना योद्ध्यां”चा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कशेळी गावातील आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका तसेच सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच आपला जीव मुठीत घेऊन स्वतःची गाडी वापरून “त्या” कोविड रुग्णांना सेवा देणारे राहुल वाडकर यांचा सत्कार ही करण्यात आला.

यावेळी आडिवरे-कशेळी पंचक्रोशीतील प्रख्यात डॉ. श्री. शंकर कलवारी आणि डॉ. सौ. सतबुद्धी कलवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कोरोना काळात डॉ. कलवारी यांनी केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. गेली ५१ वर्षे रुग्णांची अविरतपणे सेवा करणारे डॉ. कलवारी यांच्या दवाखान्याला ९ फेब्रुवारी रोजी ५१ वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी जी सेवा केली. त्या सेवेची पोचपावती म्हणून शिवसंस्कार मंडळ, कशेळी यांनी डॉ. कलवारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.

कशेळी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.शशिकांत वारीशे यांच्या हस्ते डॉ. कलवारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वरूप मेडिकल, आडिवरेचे मालक श्री. वैभव कोरगावकर यांनी कोरोना काळात रुग्णांकडे पैसे नसतानाही जी औषध सेवा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here