एम.एड्. कृती समिती जिल्हाध्यक्षपदी सुनील गोसावी यांची निवड

0

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील एम.एड्. पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षकांची सभा सावर्डेत झाली. राज्य एम. एड्. कृती समितीच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्हा कृती समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये लांजा येथील सुनील गोसावी यांची जिल्हाध्यक्ष व सरचिटणीसपदी प्रभाकर शिंगये, कार्याध्यक्षपदी संतोष काजरोळकर व संतोष जाधव यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड केली.

समितीचे राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी मार्गदर्शन केले. नूतन जिल्हाध्यक्ष सुनील गोसावी यांनी प्राथमिक शिक्षकांमध्ये अनेक शिक्षकांनी उच्च अर्हता प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांना वरच्या पदासाठी संधी मिळावी, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करू असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here