भारतीय जवानांसाठी १२ हजार २०० राख्या पाठविल्या

0

 मालवण : रक्ताचे नाते असलेला भाऊ-बहिणीचे रक्षण करतो. मात्र, आपण भारतमातेचे रक्षण करत आहात, देशसेवेचे हे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो, असा शुभ संदेश देत मालवण भंडारी ए.सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १२ हजार २०० एवढ्या विक्रमी राख्या सैनिकांसाठी पाठविल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी भूदल, नौदल व वायुदल या तिन्ही दलातील जवानांना राख्या पाठविण्यात आल्या आहेत, भाऊ- बहिणीच्या अतूट प्रेमाचे अनोखे नाते सांगणाच्या रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सलग तिस-या वर्षी भारतीय जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या सौ. एस.एस. टिकम , प्रा. पवन बांदेकर, आणि संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे दीडशे विद्यार्थिनींनी गेले महिनाभर मेहनत घेत स्वत:च्या हाताने या राख्या बनविल्या. या उपक्रमासाठी टेक्नोवा कंपनी, मुंबईचे संचालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहाय्य लाभले. जवानांना पाठविण्यात येणा-या या राख्यांचे प्रदर्शन गुरुवारी सकाळी प्रशालेत मांडण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी जय जवान, जय किसान… भारत माता की जय अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. तर काही विद्यार्थिनींनी जवानांप्रति प्रेम व आदर व्यक्त करणा-या कविताही सादर केल्या. यानंतर या राख्या पोस्टाद्वारे भारतीय सैन्याच्या विविध तुकड्यांना पाठविण्यात आल्या. यामध्ये लष्करासाठी पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल,आसाम, सिक्कीम, नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार, तसेच वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पुलवामा, लेह, जम्मू आणि काश्मीर, उधमपूर आदी ठिकाणी देश रक्षणाचे कार्य करणा-या जवानांना या राख्या पाठविण्यात आल्या. प्रा. पवन बांदेकर यांनी या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थिनींचे कौतुक केले. तर प्राचार्या सौ. टिकम यांनी यापुढेही कनिष्ठ महाविद्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी १०० हून अधिक राख्या बनविणाच्या ३९ विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सुचिताकेळुसकर (८६८)वचैतालीकेळुसकर (८००) यांनी सर्वाधिक राख्या बनविल्या.या उपक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वामन खोत, प्रा. अजित परुळेकर, प्रा. सुनंदा वराडकर, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. संपदा कोयंडे, प्रा. आजगावकर, प्रा.गुरुदास दळवी, प्रा. देवेंद्र चव्हाण, प्रा. प्रभू, प्रा. सावंत, प्रा. वाक्कर, प्रा. सरोज बांदेकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर,संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here