रत्नागिरीत कोरोनाची लागण झालेला संशयित रुग्ण सापडल्याचा वृत्ताने खळबळ उडाली आहे. मात्र सदर रुग्णाला करोना ची लागण झालेली नसली तरी अधिक खबरदारी म्हणून त्याला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. सदर बाबतीत सर्व तपासण्या झाल्यानंतर याची माहिती कळू शकेल, आम्ही त्याच्याकडे संशयित रुग्ण म्हणून त्याकडे अधिक काळजीपूर्वक बघत आहोत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोलडे यांनी रत्नागिरी खबरदार कडे केला आहे.
