एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत

0

खेड : शासनात विलीनीकरणाच्या मागणीबाबत येथील एसटी आगारातील शेकडो कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले.

राज्यात एस.टी. कर्मचारी दि.२८ ऑक्टोबर २०२१ पासून संपावर असून या संपाला तीन महिने उलटले आहेत. संपावर तोडगा निघाला नसून हा लढा न्यायालयात प्रविष्ठ आहे. अनेक कर्मचारी आता खासगी ठिकाणी काम करत असून काही कर्मचारी हाती मिळेल ते काम करत आहेत. संपामळे अनेक कर्मचाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे. वैभव खेडेकर यांनी खेड आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पक्षातर्फे मदत दिली. यावेळी अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी मनविसे तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहराध्यक्ष केत आंब्रे. दादा धामणकर, मिलिंद नांदगांवकर, जगदीश खानविलकर, जयेश गुहागरकर, प्रदीप भोसले व खेड एसटी कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 22-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here