विद्यार्थ्याने बनवले कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचावाचे उपकरण; हातीव शाळेच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड

0

देवरुख : देवरुख नजीकच्या हातीव नं. 1 शाळेच्या विज्ञान उपकरणाची इन्स्पायर अवार्ड स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्ह्यातून सहभागी झालेल्या 77 उपकरणातून 8 उपकरणांची निवड राज्यस्तरावर करण्यात आली.

त्यामध्ये प्राथमिकमधून निवड झालेली ही एकमेव शाळा आहे. या शाळेचा विद्यार्थी मनिष जाधव यांने भटक्या कुत्र्यांचे हल्ले पाहून यापासून रक्षण होण्यासाठी ‘इलेक्ट्रीक स्टीक फॉर प्रेव्हेंशन फ्रॉम स्ट्रीट डॉग’ म्हणजेच कुत्र्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करणारी काठी हे उपकरण बनवले आहे.

पदवीधर शिक्षक सुनिल करंबेळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने लाकडाची फळी, एपीयुषी पाईप, वायर बॅटरी आणि स्वीच यांचा वापर करून त्याने हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे टाकाऊ वस्तूंतून ते टिकाऊ बनवण्यात आले आहे. सर्व हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यातून बचावासाठी असणारे उपकरण कोठेही चार्ज करता येणार आहे. या उपकरणाचा उपयोग मॉर्निंग वॉक करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले व शेतात काम करणारा शेतकरी, गुरे सांभाळणारा गुराखी यांना होऊ शकतो.

या उपकरणांच्या यशाबद्दल बोलताना मार्गदर्शक शिक्षक करंबेळे म्हणाले की, आमच्या शाळेचे कुंभाराचे चाक हे उपकरण यापूर्वी राज्यस्तरासाठी निवडले गेले होते. तसेच हिरकाढणी यंत्रालाही तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. शाळेच्या या यशामध्ये मुख्याध्यापक धोंडू करंबेळे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा शिक्षक विनय होडे, श्रीकांत केसरकर, रूपाली मांगले यांचे सहकार्य लाभले आहे. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल मनिष जाधव व सुनिल करंबेळे यांचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 22-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here