इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड

0

खेड : ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या दापोली शाखेच्या अध्यक्षपदी अतुल शेठ, तर सेक्रेटरीपदी उमेश नक्षे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच खेड शहरातील मराठा भवनच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर विभागाचे युनियन अध्यक्ष मनोज भाटवडेकर व कार्याध्यक्ष शैलेश आंबेकर उपस्थित होते. युनियनची वार्षिक सर्वसाधारण नुकतीच खेड येथे झाली. यावेळी निवडण्यात आलेल्या दापोली कार्यकारिणी मंडळामध्ये उपाध्यक्ष संदीप सुरा, खजिनदार सुहास भोसले, कार्याध्यक्ष सुप्रिया भोसले, समन्वयक उत्तमकुमार जैन, सहसचिव गौरव पाडालकर, डीव्हिजन काउन्सिल मेंबर्स म्हणून सचिन बुटाला, इलियास खतीब, अनंतराय प्रभू तसेच संचालक म्हणून अश्रफ बुरोंडकर, सतीश गमरे, सनील मपारा, नम्रता वडके, कोळपे, मधुकर शेट्ये, कृष्णा गजर, मीना जोयसर, मधुकर पद्याळ, मनीषा शेठ, आत्माराम मोरे, विजय टकले, अशोक तांबे, प्रज्ञा दळवी, अतुल गाडबैल, अश्विनी विचारे यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here