खंडणी प्रकरण: पिस्तूल पुरवणाऱ्या संशयिताच्या पोलीस मागावर

0

रत्नागिरी : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून बंदर रोड येथील नॅशनल मोबाईल शॉपीच्या मालकावर गोळीबार करणाऱ्या तीन संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु, या गुन्ह्यातील पिस्तूल पुरवणारा संशयित अद्यापही नजरेआड असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. सचिन भीमराव जुमनाळकर (वय ४२), मनोहर हनुमंता चलवादी (वय ४२), सिद्धराम नामदेव कांबळे (वय २८) अशी सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. यातील पिस्तूल पुरवणारा चौथा संशयित आसिफ इनामदार (रा. गोलघुमट, विजापूर) हा कर्नाटक येथून नजरेआड झालेला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here