वेळणेश्वर येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या स्वयंचलित बेलचे सर्वत्र कौतुक

0

गुहागर: वेळणेश्वरमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित बेल तयार केली आहे. या बेलमध्ये तासिका, छोटी सुटी आणि मोठी सुटीच्या वेळा आधीच नोंदवून ठेवण्याची सोय आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळी शाळेत वेळबदलाची सूचनेसाठी कोणी कर्मचारी न लागता आपोआप मिळणार आहे. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील सुप्रिया राणे, निकिता झगडे, अनिकेत पवार व अक्षय पांचाळ या चार विद्यार्थ्यांनी ही स्वयंचलित बेल बनविली आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here