मारुती फागे यांचा उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून गौरव

0

गुहागर : वीज कर्मचारी मारुती सीताराम फागे (माऊली) यांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी परिमंडळ कार्यालय रत्नागिरी अंतर्गत उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून २०२०-२१ गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

शृंगारतळी सबस्टेशनमध्ये फागे सध्या सेवा बजावत आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, विजेच्या तांत्रिक बाबी निर्माण झाल्यास प्रत्यक्षात जागेवर जाऊन दुरुस्ती करणे, ग्राहकांना विश्वासात घेऊन वीज बिल वसुली करणे अशा कामगिरीमुळे त्यांना वीज मंडळाच्या वतीने उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांनी मंडणगड, दापोली, चिपळूण आणि गुहागरमध्ये सेवा बजावली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे शृंगारतळी आणि परिसरातील एक प्रामाणिक कर्मचाऱ्याचा महावितरणने सन्मान केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here