देवरूख : चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे. केरोसीनमुक्त राज्य करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांना गॅस वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. केरोसीन ग्राहकांकडून घेतलेल्या हमीपत्रामुळे तालुक्यात केरोसीन टैंकरचे प्रमाण ७ ने कमी झाले आहे. महिन्याला १२ टैंकर तालुक्याला लागत होते. तालुक्यातील केरोसीन ग्राहकांना केरोसीन देण्यासाठी यापूर्वी प्रत्येक महिन्याला १२ टॅकरची गरज भासत होती. टॅकरचे प्रमाण कमी करण्यावर शासनाने भर दिला. शिधापत्रिकेवर गॅसचा लाभ घेत असतानाही केरोसीन घेणारे ग्राहक तालुक्यात होते. यामुळे शासनाने केरोसीन ग्राहकांकडून गॅस नसल्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. यामुळे आपोआपच ज्या ग्राहकांकडे गॅस कनेक्शन आहे, त्यांनी हमीपत्र दिले नाही. सुमारे २४ हजार ग्राहकांनी हमीपत्र लिहून दिले. यामुळे केरोसीन घेणाच्या शिधापत्रिका १६ हजाराने कमी झाल्या. हमीपत्र घेण्यापूर्वी तालुक्यामध्ये ४० हजार केरोसीन ग्राहक होते. हे प्रमाण कमी झाल्यामुळे आपोआपच केरोसिन टैंकरचे प्रमाण कमी झाले. महिन्याला १२ टैंकर तालुक्याला लागत असत. हे प्रमाण ७ ने कमी झाले आहे. तालुक्यात सध्या ५ टॅकरने लाभार्थ्यांना रास्त धान्य दुकानाद्वारे केरोसीन पुरवठा केला जात आहे. हमीपत्राबरोबरच तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी उज्ज्वला व अंत्योदय योजनेतून गॅस कनेक्शन घेतली आहेत. हे ग्राहक देखील केरोसीन लाभापासून दूर झाले असल्यामुळेच तालुक्यातील केरोसीन टॅकरचे प्रमाण कमी झाल्याची माहिती पुरवठा नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी दिली आहे.
