ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येणार जागतिक पर्यटनाच्या नकाशावर

0

◼️ भारतातील अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट गणपतीपुळ्यात येणार

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने आता कोकणातील पर्यटन उतुंग भरारी घेताना दिसत आहे. ना. उदय सामंत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १६ कोटी ९२ लाखांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली असून याबाबतचे आदेश आज वितरीत करण्यात आले आहेत. या अंतर्गत गणपतीपुळे येथे भारतातील अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट सुरु करण्यात येणार आहे. सुमारे २ कोटी ५० लाख किमतीची हि बोट ऑक्टोबर पर्यंत येणार असून यामुळे कोकणातील जल पर्यटन जागतिक नकाशावर येणार आहे.

भारतातील अतिवेगवान पहिली जेट बोट
ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने हा जेट बोट क्लब सुरु होत असून यामुळे गणपतीपुळे जल पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सुमारे १५ ते २० पॅसेंजर बसण्याची या बोटीची क्षमता असून अवघ्या अर्ध्या तासात हि बोट गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर प्रचंड वेगात कापणार असल्याची माहिती मपवीमचे सल्लागार डॉ सारंग कुलकर्णी यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. भारतातील अतिवेगवान अशी हि पहिली जेट बोट आहे. हि बोट जेट इंजिनावर चालते व तासाला ८० किलोमीटर अंतर पार आरते. अर्ध्या फुट खोलीतील पाण्यावर सुद्धा या वेगवान जलसफारीचा आनंद घेता येतो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशातून या बोटी पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत.

गणपतीपुळे ते आरे वारे अर्ध्या तासात
या जेट बोटीसाठी कोणत्याही जेटीची आवश्यकता नसून गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर अर्ध्या तासात कापले जाणार आहे. या जेट बोटीची १ तासाची व १५ मिनिटांची अशा दोन सफारी असणार असून १५ मिनिटांची सफर हि गणपतीपुळे आसपासच असणार आहे. अत्यंत वेगवान व साहसी जल सफारीचा आनंद यामुळे पर्यटकांना मिळणार आहे. यामुळे निश्चितच कोकणातील जलपर्यटनाची वाढ होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:40 PM 23-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here