चिपळुणात तिहेरी अपघात; पाचजण गंभीर जखमी

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर सवतसडा धबधब्यानजीक तिहेरी अपघात होऊन पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. एका कारने मोटारसायकल आणि रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मंगळवारी (दि.२२) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर पेढे शितपवाडी येथे अपघात झाला. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातामध्ये सुभाष यशवंत जाधव, सुधीर गोविंद धाडवे (५०), सुवर्णा सुधीर धाडवे (४५), रोशनी जनार्दन धाडवे (२२) गायत्री गणेश जोगळे (३१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या बाबत संकेत सुधीर धाडवे (रा. परशुराम) यांनी पोलिसांत खबर दिली. संकेत हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल तसेच भाड्याने केलेलं जात होते. ते पेढे शितपवाडी येथे आहे असता समोरून येणाऱ्या भरधाव कार रिक्षासह दुचाकीला जोरदार धडक दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 24-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here