वेळेवर उपस्थित असूनही लेटमार्क पडणार….? – जि. प. कर्मचारी

0

रत्नागिरी : शुक्रवारी जि. प. भवनातील इंटरनेटची सुविधा कोलमडल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या थंब मशीनला बसला आहे. मशीनच सुरू होत नसल्याने थंब कुठे करायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला. भवनात प्रत्येक विभागात हे थंब मशीन देण्यात आले आहे. मात्र दोनच थंब मशीन सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. काहींनी रांगेत उभे राहून थंब दिला, मात्र तोपर्यंत १०.३० वाजले होते. यामुळे कार्यालयीन वेळेत उपस्थित असले तरी तांत्रिक कारणामुळे त्यांचा लेटमार्क पडणार आहे. नेट बंदला आमचा काय दोष? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here