अग्निशमन यंत्रणा सक्षम करा; नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार

0

चिपळूण नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा कमकुवत आहे. ही यंत्रणा सक्षम करावी अशी मागणी होत आहे. याबाबत सातत्याने न.प.कडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या विरोधात शिवसेनेचे माजी विभागप्रमुख नित्यानंद भागवत यांनी महाराष्ट्रदिनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.याबाबत त्यांनी न. प. चे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, न.प.च्या अग्नीशमन यंत्रणेबाबत आपण २००८ पासून सातत्याने पत्रव्यवहार करीत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या मंजूर आकृतीबंधानुसार चिपळूण न.प.मध्ये अनेक पदे रिक्त आहेत. न.प.कडे नुसते अग्नीशमन बंब आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. मेकॅनिकम फोम सिलींडर, फायरमन, अपन, सेफ्टी शूज, हेल्मेज, सेफ्टी हॅण्डग्लोज, ॲसबेस्टॉस ग्लोज, सेफ्टी गॉगल्स ही साधने नाहीत. न.प.च्या कर्मचाऱ्यांना फायर फायटिंग व प्रथमोपचाराचे प्रशिक्षण नाही. या बाबत न.प.कडे सतत पाठपुरावा करूनदेखील या विषयात गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here