खेड मध्ये अद्ययावत डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन

0

खेड : सद्या जगभरात आधुनिक तंत्रज्ञान चा ट्रेंड दिसून येत असून याच धर्तीवर ग्रामीण व शहरी भागातील विदयार्थी डिजिटल तंत्रज्ञान मध्ये घडवण्यासाठी येथील हिराभाई बुटाला विचार मंच चे अध्यक्ष कौस्तुभ बुटाला यांनी स्वतः पुढाकार घेऊन जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने भावी पिढी घडण्यासाठी येथील सहजीवन संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये डोनेशन ऑफ डिजिटल क्लास रूम चे उदघाटन उदयोजक व संस्था अध्यक्ष हिराबाई बुटाला यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.

सहजीवन महाविद्यालयात अद्यावत असलेल्या डिजिटल क्लास रूम च्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली होण्या साठि डिजिटल रूम हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून या मधून विध्यार्थी डिजिटल धडे घेणार आहेत सुमारे ४ कोटी रुपयांची आधुनिक यंत्रणा उभी करून शिक्षणाचा स्तर उंचावण्या साठी कौस्तुभ बुटाला यांनी पुढाकार घेऊन ती यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शिक्षनाचा स्तर उंचावनार आहे.

दरम्यान आय सी आय सी बँकेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष योगदाना मुळे हा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्य आधारित ४ प्रशिक्षण कोर्स आय सी एस महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून यातून कौशल्यपूर्ण विध्यार्थी घडतील असा विश्वास श्री बुटाला यांनी व्यक्त केला आहे.

या उदघाटन प्रसंगी संस्था अध्यक्ष व उद्योजक हिराभाई बुटाला यांनी मनोगत व्यक्त केले तर आधुनिक यंत्रणे बाबत कौस्तुभ बुटाला यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सहजीवन संस्था सचिव मंगेश भाई बुटाला, ना बा शेलार, राजेश बुटाला, ऍड आनंद भोसले, संजय बुटाला , प्रा बोराटे, रोहित भोळे ,प्रा गरुड हिराभाई विचार मंच चे मानस कांबळे, रोहित सरकार , रोशनी बुटाला, यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 24-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here