करोनाचा पाकलाही दणका !

0

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूमुळे 6.1 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने हा अंदाज वर्तवला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आज 97 देशांमध्ये झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत 3,3०० लोकांचा मृत्यू झाला असून संसर्ग झालेल्या लोकांची संख्या एक लाखांवर गेली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची सहा प्रकरणे नोंदली गेली आहेत. हे सर्वजण इराणच्या सहलीमधून पाकिस्तानात परतले होते. यातील तीन प्रकरणे कराची आणि तीन गिलगित-बाल्टिस्तानमधील आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अंदाजानुसार सर्वसाधारणपणे या आजारावर पाकिस्तानला 6.08 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here