महिला टी२० विश्वचषक : विजेत्या संघाला मिळणार 1 मिलियन डॉलर

0

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या अर्थात रविवारी ८ मार्च रोजी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. या विश्वचषकात आयसीसीने महिला संघांच्या बक्षीस रकमेत 2.6 यूएस डॉलरची वाढ केल्याचे मागेच घोषित केले होते. त्यामुळे टी20 महिला विश्वचषक विजेत्या संघाला आयसीसीकडून 1 मिलियन डॉलर तर उपविजेत्या संघाला 500,000 डॉलर एवढी रक्कम मिळणार आहे. यामुळे भारतीय संघाला विश्वचषकाचे तब्बल १ मिलीयन डाॅलरचे (अंदाजे ७ कोटी) बक्षिस जिंकण्याची मोठी संधी चालुन आली आहे. 2016 मध्ये पुरुषांच्या टी20 विश्वचषकातील विजेत्या वेस्ट इंडीज संघाला 1.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम मिळाली होती. त्यामुळे जर 2020 ला होणाऱ्या टी20 महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले तर ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या 1 मिलियन बक्षीस रकमेत 600000 डॉलरची भर घालून ऑस्ट्रेलिया महिला संघाला बक्षीस मानधन देणार आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीइओ केविन रॉबर्ट्स ऑक्टोबर २०१९मध्ये म्हणाले होते की, ‘आम्ही समानतेची वचनबद्धता कायम ठेवणार आहोत. त्यामुळे टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघ जी बक्षीस रक्कम जिंकतील ती रक्कम पुरुष संघाप्रमाणेच असेल. यामध्ये अंतिम सामना, उपांत्य सामना किंवा साखळी फेरीतील समान बक्षीस रकमेचा समावेश असेल.’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करारबद्ध असणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंएवढेच वार्षिक मानधनही दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here