बिपीन शहा सीए इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी

0

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेची नव्या वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आनंद पंडित, सेक्रेटरीपदी प्रसाद आचरेकर, तर खजिनदार म्हणून शशिकांत काळे यांची निवड झाली. सीए इन्स्टिट्यूटच्या गणपतीपुळे, मालगुंड येथे झालेल्या शिबिरात मावळते अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्ष सीए बिपीन शहा यांच्याकडे सोपवली. नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन सीए राजशेखर यांनी केले. सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून सीए आणि विद्यार्थ्यांकरिता विविध चर्चासत्रे, अभ्यासवर्ग घेतले जातात. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून या वर्षी सर्टिफिकेट कोर्सेस, विद्यार्थ्यांकरिता परीक्षांसाठी मार्गदर्शनपर वर्ग, करिअर कौन्सिलिंग सेमिनार घेण्याचा मानस नूतन अध्यक्ष सीए बिपीन शहा यांनी व्यक्त केला. शाखेची स्वतःची वेबसाइट व ई-न्यूजपेपरसुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here