खास शिमगोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

0

 खास शिमगोत्सवासाठी ९ मार्च रोजी कोकण रेल्वेमार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी आणि परत तसेच रत्नागिरी ते पनवेल आणि परत या मार्गावर जादा गाड्या धावणार आहेत. या दोन्ही गाड्यांकरिता विशेष तिकीट दर आकारण्यात येणार आहे. त्यापैकी 81061 / 81062 क्रमांकाची गाडी एलटीटी ते रत्नागिरी आणि परत या मार्गावर धावेल. ती गाडी ९ मार्चच्या पहाटे (८ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर) १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरीला सकाळी आठ वाजता पोहोचेल. परतीसाठी ती दुसऱ्या दिवशी (दि. १० मार्च) दुपारी पावणेतीन वाजता रवाना होईल आणि रात्री सव्वादहा वाजता एलटीटीला पोहोचेल. एकूण २० डब्यांची ही गाडी दोन्ही वेळी ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली आणि संगमेश्वरला थांबेल. दुसरी 01064 / 01063 क्रमांकाची गाडी रत्नागिरी ते पनवेल आणि परत या मार्गावर ९ मार्च रोजी धावेल. ती सकाळी सव्वाअकरा वाजता रत्नागिरीतून निघून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. तेथून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी ती रत्नागिरीकडे निघेल आणि मध्यरात्रीनंतर बारा वाजून २० मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचेल. या गाडीलाही २० डबे असतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here