चिपळूण : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून चौकशी लावल्याबद्दल आणि अटक केल्याबद्दल चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भाजप प्रणित केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आ. शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयासमोर जमलेल्या राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकत्यांनी हा निषेध शुक्रवारी (दि.२५) नोंदविला.
यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जि.प. सदस्य दिशा दाभोळकर, माजी सभापती पूजा निकम, व्यापार जिल्हाध्यक्ष मुराद अडरेकर, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. राकेश चाळके, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक, महिला पदाधिकारी आदींनी सहभाग घेतला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 26-Feb-22