मनसेचा १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी मुंबईत मेळावा

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 14 वा वर्धापन दिन आहे. वर्धापनदिनानिमित्त मनसेचा आज नवी मुंबईत मेळावा होणार आहे. मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईबाहेर वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातोय. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे अन्य नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशीत सोमवारी दिवसभर वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. तसंच राज ठाकरे या सोहळ्या दरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात मनसेचं जम्बो शॅडो कॅबिनेट जाहीर करण्याची शक्यता आहे. रविवारी राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांशी तब्बल अडीच तास चर्चा केली आणि संभाव्य शॅडो कॅबिनेट निश्चित केल्याचं सांगितलं. या शॅडो कॅबिनेटमध्ये राज्य सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवलं जाणार आहे. नवी मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मनसेचा वर्धापन दिनाचा मेळावा आज वाशीत होतोय. नवी मुंबईतील वाशीमधील सेक्टर 16 इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरु होईल. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापनदि सोहळा होणार आहे. या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here