अमेरिका, ब्रिटनसह 28 देश युक्रेनच्या मदतीला; शस्त्रे आणि वैद्यकीय पुरवठा करणार

0

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये विध्वंसाची परिस्थिती आहे. रशिया च्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सैन्याला ठार मारण्याचे दावे केले जात आहेत.

दरम्यान, आता अनेक देशांनी युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह 28 देशांनी युक्रेनला वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे. यासोबतच या देशांनी युक्रेनला शस्त्र उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली आहे. रशियन सैनिकांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात युक्रनचे लोक जखमी झाले आहेत. युक्रेनमध्ये नागरिकांसोबतच लष्करी तळांनाही लक्ष्य केले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला युक्रेनला 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाकडे मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे आणि सैन्य आहे, त्यामुळे युक्रेनवर दबाव आहे. स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विदेशी सहाय्य कायद्याद्वारे वाटप केलेले 350 दशलक्ष डॉलर युक्रेनच्या संरक्षणासाठी देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 26-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here