कळझोंडी गाणसुरवाडी येथील प्रलंबित पुलाचा अखेर भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

0

◼️ जिल्हा वार्षिक योजनेतून ३८ लाखाचा निधी मंजूर

खंडाळा (किशोर पवार) : रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी गाणसुरवाडी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य पुलाचा भूमिपूजन समारंभ पंचायत समितीच्या सभापती सौ. संजना माने यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य गजानन तथा आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी पंचायत समितीच्या सक्रिय सदस्या सौ. मेघना पाष्टे, शिवसेना विभाग प्रमुख योगेंद्र तथा बाबया कल्याणकर, उपविभाग प्रमुख अजिमभाई चिकटे, उदय माने, सामाजिक कार्यकर्ते महादेव पाष्टे, ग्रा.पं. सदस्या सौ. वेदिका निंबरे, सूर्यकांत बंडबे, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. येणेगुरे, ठेकेदार- मोहनराव चव्हाण, विष्णुराव चव्हाण, गाणसूरवाडीतील सेवाभावी व दानशूर सामाजिक कार्यकर्ते सुरेश वीर, गणपत वीर, तुकाराम फडकले, यशवंत वीर, लक्ष्मण वीर, संदीपशेठ पवार, पांडुरंग सनगरे, पांडुरंग शितप, सामाजिक कार्यकर्ते महादेव आग्रे यांच्यासमवेत महिला व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

गेली दोन वर्षापासून या पुलाच्या कामासाठी कळझोंडी ग्रामस्थांची फार मोठी धडपड सुरू होती. भर पावसातून हा पूल खचल्याने गावातील लोकांची मोठी गैरसोय झाली होती.पलिकडील संपर्क तुटला होता. पुलाची प्रलंबित राहिलेली ही मागणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य व विकास कामांचा कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या गजानन उर्फ आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास जात असल्याने तमाम ग्रामस्थ, नागरिक व महिलांनी श्री. गजानन पाटील व धडाडीच्या विद्यमान सभापती सौ.संजना माने, माजी सभापती सौ. मेघना पाष्टे यांचे बुके देऊन तसेच औक्षण करून भव्यदिव्य असे स्वागत केले. हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

या पुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन श्री.कदम यांनी केले. शेवटी सर्वांना गोड पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:01 PM 26-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here