आ. शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डेतील विद्यालयात सामाजिक उपक्रम

0

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सावर्डेतील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात डोळे तपासणी व मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर व औषधी वनस्पती वाटप व लागवड या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनीतकुमार पाटील, विद्यालयाचे प्राचार्य रफिक मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, गरजू नागरिकांनी व सावर्डे ग्रामस्थांनी डोळे तपासणी व मार्गदर्शन आणि औषधी वनस्पती लागवड या शिबिराचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य रफीक मोडक यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 28-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here