रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार

0

रत्नागिरी : मनसेकडून रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षविरहित प्रतिष्ठितांना संघटनेत आणून क्रियाशील करण्यासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर पक्षसंघटनेला मजबूत करणारे इतर राजकीय पक्षातील तरुणांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

निवडणुकीवेळी यातील ज्या तरुणांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही, त्यावेळी अशा तरुणांना मनसेकडे घेतले जाणार आहे. दरम्यानच्या काळात छोटे-मोठे पक्षप्रवेश कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मितीही केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत ही निवडणुक न लढण्याचा निर्णय होता. मात्र आता मनसे निवडणुकीच्या निर्णयात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 28-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here