कर्नाटकातील हत्येचा ‘विहिंप’तर्फे रत्नागिरीत निषेध

0

रत्नागिरी : कर्नाटकातील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची जिहादी मानसिकतेच्या लोकांनी निर्घृणपणे हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल रत्नागिरी प्रखंडतर्फे येथील पतितपावन मंदिरात हर्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिहादी मानसिकतेच्या लोकांचा निषेध करण्यात आला.

हिंदुत्ववाद्यांची नियमित होणारी हत्या थांबवण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री केनवडेकर, बजरंग दलचे प्रखंड संयोजक अभिषेक माने, विश्व हिंदू परिषदचे प्रखंड मंत्री दीपक जोशी, डॉ. सुजय लेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गजानन करमरकर, हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंद्रकांत राऊळ, बजरंग दलचे विराज चव्हाण आणि बहुसंख्य हिंदूप्रेमी नागरिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 28-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here