विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
