युक्रेनमधील १८२ विद्यार्थी मायदेशी परतले; केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर स्वागताला

0

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतंर्गत मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर युक्रेनहून आणखी एक विमान आले. या विमानात १८२ विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर उपस्थित होते. विद्यार्थी विमानातून उतरण्यापूर्वी नारायण राणे यांनी विमानात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी मुंबईत युक्रेनहून विमान आले होते तेव्हा केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे स्वागतासाठी उपस्थित होते. आतादेखील नारायण राणे याठिकाणी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युक्रेनहून परत आणण्याच्या मोहीमेवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. गेल्यावेळी युक्रेनहून मुंबईत विमान आले तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही विमानतळाबाहेर उपस्थित होते. तर दुसरीकडे भाजपकडून विमान मुंबईत आल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना पाठवून या मोहीमेच्या श्रेयात आणखी कोणीही वाटेकरी असणार नाही, याची पूरेपूर काळजी घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत आतापर्यंत युक्रेनहून ६०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 01-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here