देवरुख येथील श्री गणेशवेद पाठशाळेला संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठीचा पुरस्कार प्रदान

0

देवरुख : जागतिक मराठी भाषादिनी रत्नागिरी येथे देवरुख येथील श्री गणेशवेद पाठशाळेला संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कविकुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, रत्नागिरी उपकेंद्रामार्फत हा पुरस्कार उच्च व तंत्रशिक्षणमंञी उदय सामंत यांच्या हस्ते हे मानपञ प्रदान करण्यात आले.

वेदपाठशाळेचे विश्वस्त रविंद्र साठ्ये यांनी हे मानाचे मानपत्र स्विकारले. रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न पा.वा.काणे संस्कृत अध्ययन केंद्र असे नामकरण करण्यात आले. या नामकरण सोहळ्यात श्री गणेशवेद पाठशाळेला गौरवण्यात आले.

यावेळी कुलगुरु प्रा.मधुसुदन पेन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील श्री गणेशवेदपाठशाळा कोकण प्रदेशातील संस्कृती जोपासत आहे. वेदअध्ययन करुन नवीन पिढी घडवत आहे.

संस्कृतमधील बीजरक्षणाचे कार्य नेटाने पुढे नेत आहे. आजघडीला १८ विद्यार्थी वेदअध्ययन करत आहेत. वेद अध्ययनाबरोबरच वेदपाठशाळा सामाजिक बांधिलकी जपत आहे. चिपळुण येथील पूरग्रस्तांसाठी अन्नदान, जनरेटरच्या माध्यमातुन पाणीपुरवठा केला गेला. देवरुखशहरासाठी मोफत शववाहीका उपलब्ध करुन दिलेली आहे. लवकरच नक्षत्रबागेचा प्रकल्प साकारला जाणार आहे. गोशाळा, यज्ञशाळा लक्षवेधी ठरली आहे. या सर्व उपक्रमाची दखल घेवुन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 01-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here