रत्नागिरी: तालुक्यातील जयगड बंदरात रविवारी दाखल झालेल्या ‘अँथेनिया फोनिक्स’ अणि ‘मिक्रो लिब्रो’ या दोन जहाजांतील ४२ परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील एकही कोरोनाचा संशयित रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांनी सांगितले.
