‘दिशा सालियनची केस रिओपन झाली, तर शिवसेनेला…’; नारायण राणेंचा गर्भित इशारा

0

नाशिक : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला. ‘दिशा सालियन ही रॉय नावाच्या मुलाबरोबर रहात होती. आई-वडिलांशी तिचं पटत नव्हतं. दिशाची केस रिओपन झाली तर शिवसेनेला महागात पडेल, असा गर्भित इशारा राणे यांनी आज दिला.

नाशिक येथील आयटी कॉनक्लेव्ह २०२२ चे उद्घाटन राणे यांनी आज केलं. त्यावेळी ते बोलत होते. ‘दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचा तपास झाला तर या प्रकरणात कोण मंत्री सहभागी आहे ते समोर येईल. आम्ही दिशाची बदनामी केली नाही, उलट आम्ही तिला न्याय मिळवून देत आहोत, त्याबद्दल दिशाच्या कुटुंबातील व्यक्तींनी आमचे आभार मानले पाहिजेत, असं राणे म्हणाले. ‘संजय राऊत चांगली सुरुवात करत आहेत. पण शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची फाईल आमच्याकडे तयार आहे. माझ्याकडं चोपड्या आहेत. संजय राऊतांनी यादी दिली तर मी देखील देईन. संजय राऊत हे ईडीच्या घेऱ्यात आहेत. त्यांचा पार्टनर आणि मुली अडकल्या आहेत. राऊत हे शिवसेनेच्या हिताचं काम करत नाहीत. राष्ट्रवादीच्या मदतीनं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं राणे म्हणाले. ‘महाविकास आघाडी सरकार राज्यातील अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य कामं करून घेत आहे. सचिन वाझे हे त्याचंच उदाहरण आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. सुशांतसिंहची हत्या झाली होती, ती आत्महत्या दाखवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.

‘या सरकारला काहीच कळत नाही. तामिळनाडू सारखी राज्ये पुढं चालली आहेत. सरकारला दोन पत्रं पाठवली. राज्याला पुढं न्यायचं असेल तर योजना आणाव्या लागतील. पण त्यासाठीच्या बैठकांना राज्यातील सरकारनं वेळ दिला नाही. भाजपसोबत युती करून शिवसेना निवडून आली. मुख्यमंत्रिपद भाजपला मिळतंय म्हणून गद्दारी केली. पंतप्रधानांवर आरोप करायची लायकी नाही, पात्रता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही. राज्याच्या प्रगतीवर बोलत नाहीत. विकास, शिक्षण हे विषय नाहीत. काम करणारी शिवसेना आता राहिली नाही,’ असं राणे म्हणाले.

‘राज्यपालांकडून अशी चूक होणार नाही!’

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राणे यांनी अधिक बोलणं टाळलं. ‘राज्यपालांकडून चूक होईल असं मला वाटत नाही. मी त्यांचं भाषण पाहिलं नाही. पाहिल्यावर प्रतिक्रिया देईन,’ असं राणे यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:35 PM 01-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here