९७ टक्के असूनही भारतात मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, म्हणून…; यूक्रेनमध्ये मुलाला गमावलेल्या बापानं मांडली व्यथा

0

रशियन सैन्यानं मंगळवारी सकाळी खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

त्या विद्यार्थ्याचं नवीन शेखरप्पा असं असून तो २१ वर्षांचा होता. हे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याला पीयूसीमध्ये ९७ टक्के मिळूनही भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नव्हता अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपल्या मुलाला पीयूसीमध्ये ९७ टक्के गुण मिळाले होते. असं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन युक्रेनला गेलेल्या नवीनच्या वडिलांनी सांगितलं. त्याला यानंतरही आपल्या इकडे वैद्यकीय शिक्षणासाठी सीट मिळाली नाही, असं नवीनच्या वडिलांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

“आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवायला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. जिकडे आपल्याकडे एका सीटसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, तिकडे कमी खर्चा भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात समान शिक्षण मिळतं,” असंही ते म्हणाले.

२१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
रशियन सैन्याने मंगळवारी सकाळी खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. दरम्यान, युक्रेनमधील खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या वडिलांशी संपर्क साधून शोक व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 02-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here