ग्रामपंचायत निवडणूक फॉर्म भरताना उमेदवाराला जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक

0

 राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका धोक्यात आल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अडचणी वाढल्या आहेत. 5 मार्चला याबाबत जीआर काढण्यात आला. ग्रामपंचायत निवडणूक फॉर्म भरताना उमेदवाराला जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र 13 मार्च फार्म भरण्यासाठी हा शेवटचा तारीख असल्याने उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना 5 ते 6 दिवसात जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाहीत. त्यामुळे या निवडणुका धोक्यात आहेत. राज्यात या महिन्यात 1500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.

IMG-20220514-WA0009

राज्यात दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 19 जिल्ह्यातील सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अधिसूचना 24 फेब्रुवारीला काढली आहे. थेट सरपंच व सदस्य निवडीसाठी पुढील महिन्यात 29 तारखेला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी 30 मार्चला मतमोजणी होणार आहे. सोमवार (24 फेब्रुवारी) आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मूदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here