खेडशी येथे जुगार चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : खेडशी येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून पकडलेल्या आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतुल भरत कुळ्ये (२४) भरत विश्वनाथ कुळ्ये (५०, दोन्ही रा. पोमेंडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ते दोघे बेकायदेशिरपणे लोकांकडून पैसे स्विकारुन जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 02-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here