‘दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री नसून मुख्यमंत्रीच आहात’ – चंद्रकांत पाटील

0

‘अजितदादा डायनॅमिक लीडर आहेत. दादा तसे प्रेमळ आहेत, फक्त रागीट वाटतात. दादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज येत नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात’, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार आणि कोथरुडचे भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विविध विकास कामांवर भाष्य करताना अजित पवारांकडे विमानतळ आणि हेलिकॉप्टरची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘प्रत्येक जिल्ह्याला एक छोटं का होईना विमानतळ असलं पाहिजे. सगळे नियम पूर्ण करणारे एक हेलिपॅड प्रत्येक जिल्ह्यात असावं. अत्यावश्यक वेळेत हे गरजेचे आहे. अजित पवार या मागण्या पूर्ण करतील. ते डायनॅमिक लीडर आहेत. तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात’

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here