रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा ते राममंदिर आणि अर्ध्या मुरूगवाड्यात अद्याप पाण्याची बोंब सुरूच आहे. शहराच्या अर्ध्या-अर्ध्या भागात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा उपाय या भागाला लागू पडलेला नाही. फारच कमी दाबाने या परिसराला पाणी पुरवठा होत आहे. तक्रारी करूनही पाणी विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नसल्याचे स्थानिक नगरसेवक सुहेल साखरकर यांनी सांगितले.
