चिकनमुळे कोरोना पसरतो अशा अफवा टाळण्यासाठी सरकारकडून चिकन फेस्टिव्हलचे आयोजन

0

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नाही हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. मात्र, तरीही चिकन खाल्ल्याने कोरोना या जीवघेण्या रोगाची लागण होते, अशी अफवा राज्यात जोरदार पसरली आहे. त्यामुळे लोकांनी चिकन खाणे कमी अथवा बंद केले आहे. याचा परिणाम राज्यातील पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लवकरच चिकन फेस्टिव्हलचं आयोजन केले जाणार आहे. नागपूर आणि मुंबईत चिकन फेस्टिव्हल भरवला जाणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here