“दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या”; भाजपा आक्रमक

0

मुंबई : राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नवाब मलिकांना ईडीची अटक, एसटी महामंडळाचं विलिनीकरण, मराठा आरक्षण यासारख्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या काही मिनिटांत अभिभाषण आटोपतं घेतलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदार आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा आमदारांच्या हातात काही पोस्टर्स होते. या पोस्टर्सवर नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमचा फोटो सुद्धा होता. “दाऊदच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या” असा उल्लेखही या पोस्टर्सवर आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची एक बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here