फरारे येथे बेकायदेशीरपणे खारफुटीची कत्तल

0

दापोली : दापोली तालुक्यातील फरारे येथे बेकायदेशीर खारफुटीची तोड झाल्याची तक्रार उसगाव येथील सुयोग श्रीराम वैद्य यांनी केली महसुल विभागाकडे केली आहे.

संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरण व सागरी जीवाचे संवर्धनाचे दृष्टीने भारत सरकारने पर्यावरण संरक्षण अधिनियम लागू केलेला आहे.

या कायद्यातील तरतुदीनुसार समुद्र, खाड़ी वा नदीकिनारी असणाऱ्या खारफुटीचे झाडांना कायद्याने संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे. खारफुटीचे झाडांना नुकसान होईल अशा कोणत्याही कृत्यास सदर झाडे तोडण्यास कायद्याने बंदी आहे. मत्स्यजीव आणि अन्य सागरी जीवांच्या प्रजनन आणि पैदाशीच्या दृष्टीने खारफुटीच्या झाडांची आवश्यकता असते.
दापोली तालुक्यामध्ये सागर व खाडी किनारे लाभलेली अनेक गावे आहेत. त्यामधील फरारे हे वाशिष्ठी नदीच्या खाडीकिनारी वसलेले गाव आहे. सदर गावामध्ये खाडी किनाऱ्यावर खारफुटीची अनेक झाडे आहेत. त्या झाडांचा एक संरक्षक पट्टा किनाऱ्यालगत पसरलेला आहे.

अशा प्रकारे सागरी जीवसृष्टीस पोषक वातावरणाची निर्मिती तेथे झालेली आहे. सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ह्रास राजरोस चालू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धनदांडगे आणि खाजगी कंपन्या सरसकट प्रदूषण, अतिक्रमण, वृक्षतोड असे प्रकार करित आहेत. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या घनदाट जंगलाबाबत देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या भागातील खारफुटीची पूर्णपणे कत्तल करण्यात आलेली असून साफसफाईच्या नावाखाली सरळसरळ कायदेभंगाचा प्रकार झालेला आहे. याप्रकरणी आपण कारवाई करावी अशी मागणी वैद्य यांनी तक्रारीद्वारे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here