श्रेयस अय्यरची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

0

दुबई : श्रेयस अय्यरने आयसीसी टी-२० क्रमवारीत तब्बल २७ स्थानांची मोठी झेप घेत १८ वे स्थान गाठले.
विराट कोहली हा मात्र अव्वल दहा खेळाडूंमधून बाहेर पडला. श्रीलंकेविरुद्ध स्थानिक मालिकेत मिळालेल्या विजयामुळे भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत मोठे बदल झाले.

श्रेयसने तीन सामन्यांच्या मालिकेत तीनही सामन्यात अर्धशतके ठोकली होती. २७ वर्षांच्या या फलंदाजाने १७४ च्या स्ट्राईकने तीन सामन्यात नाबाद २०४ धावा केल्या. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार तीन स्थानांची झेप घेत १७ व्या स्थानावर दाखल झाला. श्रीलंकेचा पाथूम निसांका हा नवव्या स्थानावर आला. कोहली मात्र दहावरून १५ व्या स्थानी घसरला. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती.

फलंदाज
१. बाबर आझम (पाकिस्तान) : ८०५
२. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) : ७९८
३. एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका) : ७९६
४. डेव्हिड मलान (इंग्लंड) : ७२८
५. डीवोन कॉन्वे (न्यूझीलंड) : ७०३

गोलंदाज
१. तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका) : ७८४
२. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) : ७५२
३. आदिल राशिद (इंग्लंड) : ७४६
४. ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) : ७१९
५. राशिद खान (अफगाणिस्तान) : ७१०

ष्टपैलू
१. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) : २६५
२. शाकिब अल हसन (बांगलादेश) : २३१
३. मोईन अली (इंग्लंड) : २०५
४. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : १७३
५. लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) : १७१

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here