चौगुले फोटोज च्या चौथ्या शाखेचा शुभारंभ

0

त्नागिरी : फोटोग्राफी क्षेत्रातील अग्रगण्य ब्रॅण्ड चौगुले फोटोज ची रत्नागिरी शहरातील चौथ्या शाखेचा शुभारंभ जावकर प्लाझा, जयस्तंभ रत्नागिरी येथे व्यापारी संघटनेचे सल्लागार व रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजू यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेशशेठ भिंगार्डे, तालुकाध्यक्ष निखीलशेठ देसाई, हॉटेल व्यवसायिक गणेश धुरी, उद्योजक अमोलशेठ डोंगरे, फोटोग्राफर कांचन मालगुंडकर, विलासशेठ शेटये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

चौगुले फोटोज चे गुरू चौगुले यानी 2000 साली फोटोग्राफी क्षेत्रात पहीले पाऊल टाकले. यासाठी त्यांना बंधू प्रसिद्ध फोटोग्राफर राजू चौगुले यांच मोलाच सहकार्य लाभले. गुरू चौगुले यांची पहीली शाखा 2006 साली सुरू झाली. चौगुले यांच्या पाली तसेच म्हापसा गोवा येथेही फोटो स्टुडीओ च्या शाखा आहेत. त्यांनी रत्नागिरीत पहीली शाखा 2017 मध्ये सुरू केली. उत्तम फोटोग्राफी, जलद सेवा, माफक दर, उत्तम क्वालीटी, प्रोडक्ट मधील भरपुर व्हरायटी यांच्या जोरावर अल्पावधीतच रत्नागिरी करांच्या आशिर्वादाने रत्नागिरी शहरात 4 थी फोटो स्टुडीओची शाखा सुरू केली. गुरू चौगुले यांना फोटोग्राफीत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हातील फोटोग्राफर च्या संघटना बांधणीत ही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हातील सर्व फोटोग्राफर प्रगत, अद्यावत व्हावेत यासाठी त्यानी जिल्हात शेकडो वर्कशाॅप व वेबीनार यांचे आयोजन केलेले आहे. त्यांच्या चौगुले फोटोज नावाने मच्छीमार्केट रोड, लाला काॅम्प्लेक्स, जिल्हा परिषद ऑफीस जवळ शाखा आहेत. तर नविन शाखा जावकर प्लाझा जयस्तंभ आजपासुन सुरू होत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर तसेच फोटोग्राफर बंधू उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here