६०वी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्चपासून रत्नागिरीत

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६०वी संगीत राज्य नाट्य स्पर्धा २०२१-२२ येत्या १० मार्च ते २७ मार्च दरम्यान रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.

हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते.

या वर्षी सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला असून नक्कीच ही स्पर्धा चुरशीची होणार आहे.

संगीत नाट्य स्पर्धेला नेहमीच रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. यात तरुण वर्गाबरोबर वृद्ध प्रेक्षक देखील तितक्याच आवडीने ही नाटके पाहायला येत असतात आणि म्हणूनच रत्नागिरी केंद्रावरील प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून यावर्षी देखील संपूर्ण नाट्य महोत्सवाचे एकत्रित सिजन तिकीट रसिकप्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे.

दिनांक ५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेमध्ये सीजन तिकिटे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उपलब्ध होणार आहेत.

आयोजकांकडून 450 सिजन तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला एका वेळी फक्त जास्तीत जास्त ३ तिकिटे घेता येतील, तरी रत्नागिरीतील संगीत प्रेमी रसिकांनी याचा नक्की लाभ घ्यावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:33 PM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here