येत्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरीत विद्यार्थिनींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

पुढील शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरीत केवळ विद्यार्थिनींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिमगोत्सव आणि अन्य कार्यक्रमांसाठी श्री. सामंत रविवार दि. ०९ ला रत्नागिरीत आले होते. करोना आजाराविषयीच्या खबरदारीची तसेच आढावा बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर ते म्हणाले की, केवळ विद्यार्थिनींसाठी रत्नागिरीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्याची जागा निश्चिती आणि किती विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल इत्यादी तपशील अद्याप ठरलेला नाही. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होईल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here