आंबवली येथे विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील आंबवली वरचीवाडी येथील कठडा नसलेल्या एका विहिरीत पडलेल्या गव्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुटका केली.

जयराम सावंत यांच्या ‘नव्याचे पाणी’ याठिकाणी असलेल्या विहिरीत गवा पडल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. विहिरीजवळून काही ग्रामस्थ जात असताना त्यांना विहिरीतून पाण्याचा मोठा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता गवा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.

ही खबर सरपंच संतोष सावंत यांनी देवरूख वनविभागाला दिली. ही विहीर अडचणीच्या ठिकाणी असल्याने कोणतेही वाहन, जेसीबी तिथे नेणे अशक्य होते. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना मदतीला घेऊन विहीर एका बाजूने खोदण्याचे काम सुरू केले. त्यामुळे गवा विहिरीबाहेर आला आणि त्याला जीवदान मिळाले.

सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, सूरज तेली, संजय रणधीर, राहुल गुंठे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेऊन विहिरीत पडलेल्या गव्याची सुटका केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 04-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here