महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी नोंदणीला ७ मार्चपासुन सुरुवात

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळा मार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचे पार्श्वभूमीवर मागील २ वर्षे अनेक अडचणींचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागला होता. मात्र चालू वर्षाकरीता आंबा उत्पादकांची आंबा विक्री करीता स्टॉल उपलब्ध होण्याकरीता नोंदणी दि. ०७ मार्च २०२२ पासुन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ.भास्कर ना.पाटील यांनी दिली.

स्टॉल नोंदणी करीता आंबा नोंदीसह ७/१२ उतारा (मागिल ६ महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणा-या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाण पत्र प्रत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे नावे रु.१०,०००/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ.कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. इच्छूक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे विभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी (०२३५२-२९९३२८) अथवा श्री.कपिल खामकर, कृषि व्यवसाय पणन तज्ञ (८८०५६५२२३३) यांचेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 04-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here