कोरोनामुळे इराणमध्ये 70 हजार कैद्यांची सुटका करण्याचे आदेश

0

जगाला भेडसावणाऱ्या करोना विषाणूने आता आपला फैलाव वाढवला आहे. कारण चीननंतर सर्वाधिक बळी हे इराणमध्ये गेले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये करोनामुळे 237 लोक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत या देशात करोनाची लागण झालेले 595 नवे रुग्ण समोर आले आहेत त्यातल्या 43 जणांचा मृत्यूही झाला आहे. करोनामुळे इराणमधली परिस्थिती भीषण आहे या पार्श्वभूमीवर येथे 70 हजार कैद्यांची अनिश्‍चित कालावधीसाठी सुटका करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हजारो कैद्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कैदी समाजाला नुकसान पोहचवत नाही तोपर्यंत अनिश्‍चित कालावधीसाठी त्यांची सुटका करण्यात आली आहे असे इराणने सांगितले आहे. या कैद्यांना पुन्हा कधी तुरुंगात डांबण्यात येणार याविषयी अजून काही स्पष्ट करण्यात आले नाही. चीननंतर करोनाचा फटका हा इराणला अधिक बसला आहे. या देशात करोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ही सात हजारांहून अधिक आहे. इराणमध्ये 20 मार्चला नववर्ष साजरे केले जाणार आहे. यावेळी सुट्ट्या असल्याने सर्वाधिक लोक घराबाहेर पडतील अशी भीती आहे. मात्र सध्या इथली परिस्थिती पाहता लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना केल्या जात आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here