पाकिस्तानमधील पेशावरच्या मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 30 लोकांचा मृत्यू

0

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका मशीदीमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये कमीतकमी ३० लोकांचा मृत्यू झाला आहे.

नमाज पठणावेळी आलेल्या गर्दीला लक्ष्य करण्यात आले. या घटनेमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

 शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका आत्मघातली बॉम्बरनं स्वत:ला गर्दीमध्ये स्फोटकांनी उडवून दिलं. या हल्लानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झालं आहे.

जखमींची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:39 PM 04-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here