खेर्डी माळेवाडी येथे रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

0

चिपळूण : माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या पुढाकाराने कोयना भूकंप निधीतून मंजूर झालेल्या खेर्डी माळेवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते नुकतेच झाले.

यावेळी सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, ग्रा. पं. सदस्य विनोद भुरण, अभिजित खताते, युवा सेनेचे उमेश खताते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार चव्हाण यांनी डांबरीकरण कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here