दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधिताची नोंद नाही

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 502 तपासण्यांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तर 1 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 9 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 1 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 900 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.99 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 443 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 8 तर संस्थात्मक विलगीकरणात 1 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:20 PM 04-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here